चांदीच्या ताटात खव्याचा पेढा, आमचे हे म्हणजे ज्ञानेश्वरांचा रेडा.
प्रीती झिंटाच्या गालावर पडतात छान छान खळ्या, आमच्या यांचे दात म्हणजे लाकडाच्या फळ्या.
कांदयात कांदा कुजका कांदा, आमच्या यांना बोचक्यात बांधा.
वरून गोरे, आतून काळे, माझे मिस्टर दिसतात भोळे, पण अंगात लई चाळे.
घालत होते वेणी - फणी समोर होता आईना, … रावांनी मारली मिठी पण मी मिठीत माईना.
पुणे ते मुंबई वेचत गेले खडे, आमचे ... राव पोंग्यासाठी रडे.
काळी घोंगडी पट्ट्या पट्ट्याची, आणि ... माझी एका रट्ट्याची.
पुणे ते मुंबई लावला लसुन, ... गेली रुसून, तर तिला आणली गाढवावर बसून.
आत घरात मद घर, मद घरात ठेवली परात, लय वाढावा बोलू नका, नाहीतर गावातून काढेल तुमची वरात.
आला आला रुखवत त्यात होता भवरा, सगळ्यात भारी माझाच नवरा.
हंड्यावर हंडे सात हांडे, त्यावर ठेवली परात, ननंद बाई जास्त नका बोलू गुपचूप जा घरात.
रंगात रंग लाल रंग, नणंदबाई असतात नेहमीच व्हाट्सअप मध्ये दंग.