तुम्हाला माहित आहे का भारतामध्ये किती प्रकारच्या हातमाग रेशीम साड्या आहेत? 

पैठणी सिल्क साडी

अतिशय सुंदर आणि रुबाबदार दिसणारी ही पैठणी सिल्क साडी महाराष्ट्रातील पैठण आणि येवला या ठिकाणी तयार केली जाते.

बनारसी सिल्क साडी 

या भरजरी साडीचे विणकाम उत्तरप्रदेशातील बनारस / वाराणसी या ठिकाणी केले जाते.

आसाम सिल्क साडी

आसामची राजधानी गुवाहाटी या ठिकाणच्या सुआलकुची इथे आसाम सिल्क साड्यांचे मोठ्या प्रमाणात विणकाम केले जाते.

कांजीवरम सिल्क साडी

तामिळनाडूतील प्रसिद्ध ठिकाण कांचीपुरम या शहरामध्ये ही अतिशय सुंदर आणि मोहक साडी हातमागावर तयार केली जाते.

चंदेरी सिल्क साडी 

मध्यप्रदेशातील चंदेरी या गावामध्ये या साड्या रेशीम पासून तयार केल्या जातात म्हणून या साडीला चंदेरी सिल्क साडी म्हणतात. 

ऑर्गेन्झा सिल्क साडी

वजनाने अतिशय हलकी, कुरकुरीत व  कडक फॅब्रिक आणि दिसण्यास अगदी निखळ पारदर्शक अशी ही ऑर्गेन्झा साडी भारतातील सर्वात सुंदर साड्यांपैकी एक आहे.