साखरेचे पोते सुईने उसवले, ... ने मला पावडर लावून फसवले.
शेतकरी मुलगा नको म्हणून मुली फिरतात जोमात, .... एकदा येऊन बघ शेतात, आपली शेती पाहून जाशील डायरेक्ट कोमत.
नांगरणी झाली, पेरणी झाली, जोरात पाऊस आला, ... समोर झुकेगा नई साला.
निसर्गाच्या रंगाने रंगला श्रीकृष्ण सावळा, ... रावांचे नाव घेते, आज आहे आमच्या लग्नाचा सोहळा
चार एकर शेतात लावला ऊस आणि कांदे,... बरोबर लग्न करण्यासाठी झाले माझे वांदे.
पाऊस आला, पेरणी झाली, सगळे गेले निंदायला, ... आहे पक्की माझ्याबरोबर भांडायला.
शेतीमध्ये कष्ट करावेच लागतात मनापासून, नाहीतर ... मला भाकर देईल का घरात बसून.