लग्नामध्ये नवरीसाठी सुंदर पारंपरिक नऊवारी साडीचे प्रकार

महाराष्ट्रीयन नऊवारी साडी जिला काष्टा  किंवा लुगडे असे देखील म्हणतात. 

पारंपरिक कोल्हापुरी नऊवारी साडी 

कोल्हापुरी नऊवारी साडी दिसायला अतिशय सुंदर आणि परिधान करण्यास देखील अगदी सुलभ आहे

पारंपारिक साधी नऊवारी 

या साडीला पुढच्या बाजूला पायघोळ असतो.  ही नऊवारी साडी नेसण्याची अगदी पारंपरिक पद्धत आहे. 

एक धोती नऊवारी

एक धोती नऊवारी साडीमध्ये नऊवारी साडी ही धोती सारखी आणि अतिशय सुंदर दिसते. 

पारंपरिक ब्राह्मणी नऊवारी साडी

ही नऊवारी साडी ब्राम्हण स्त्रिया एका विशिष्ट पद्धतीने नेसतात म्हणून या साडीला ब्राह्मणी नऊवारी साडी असे म्हणतात. 

मयुरपंखी नऊवारी साडी किंवा राजलक्ष्मी नऊवारी

ही नऊवारी साडी नेसल्यानंतर मोराच्या पिसाऱ्यासारखी अतिशय सुंदर दिसते आणि ही नऊवारी शक्यतो शिवलेली असते.

मराठमोळी नऊवारी

ही नऊवारी साडी पायाभोवती विशिष्ट पद्धतीने घट्ट गुंडाळून साडीचा पायघोळ हा मागच्या बाजूला असतो.  

पेशवाई नऊवारी साडी 

ही नऊवारी साडी पेशवेकालीन महिला एका विशिष्ट आणि अतिशय सुंदर पद्धतीने नेसत.