लाइफस्टाइलफॅशन

नऊवारी साडी बद्दल पूर्ण माहिती आणि प्रकार

Traditional bramhani nauvari saree
Traditional bramhani nauvari saree

नऊवारी साडी (Nauvari saree), ज्याला ‘काष्टा’ किंवा ‘लुगडे’ साडी म्हणूनही ओळखले जाते, ही एक पारंपारिक महाराष्ट्रीयन साडी आहे जी एका अनोख्या पद्धतीने नेसली जाते. हे सामान्यत: महाराष्ट्रातील स्त्रिया विवाह, सण आणि धार्मिक समारंभ यांसारख्या सांस्कृतिक आणि पारंपारिक प्रसंगी परिधान करतात. नऊवारी ही फक्त एक फॅशन नसून महाराष्ट्राचा एक पारंपारिक वारसा आहे. आणि आजही महाराष्ट्रीयन लोक तो जपतात.


Marathi Saree
Marathi Saree

“नऊवारी” या शब्दाचा अर्थ “नऊ गज” असा होतो, जो साडीच्या लांबीला सूचित करतो. साडीला पायघोळ सारखे लूक बनवण्याने साडीचे एक टोक पायांच्या मध्ये अडकवलेले असते आणि दुसरे टोक खांद्यावर बांधलेले असते. नंतर साडी कमरेभोवती गुंडाळली जाते आणि मागच्या बाजूला खोचली जाते, आणि पुढच्या बाजूला प्लीट्स तयार करतात.

नऊवारी साड्या सामान्यत: सूती किंवा रेशमापासून बनवल्या जातात आणि त्या मोर, फुले यांसारख्या पारंपारिक डिझाइनसह सुशोभित केल्या जातात. या साड्या लाल, हिरवे आणि पिवळ्या यासारख्या रंगांपासून ते गुलाबी आणि निळ्यासारख्या पेस्टल शेड्स पर्यंत विविध रंगांमध्ये उपलब्ध असतात.

नऊवारी साडी चा इतिहास | History of nauvari saree

Red and Gold Maharashtrian Bridal Ensemble

नऊवारी साडी चा शोध हा फार जुन्या काळी लागलेला आहे. जेव्हा राज घराण्यातील स्त्रियांवरती युद्धक्षेत्रात उतरण्याची वेळ आली, तेव्हा त्या स्त्रियांनी त्यांचे पारंपारिक पेहराव सोडून काष्टा पद्धतीने साडी नेसण्यास सुरुवात केली. आणि ज्यामुळे त्या महिलांना पुरुषांप्रमाणेच रणांगणामध्ये न घाबरता फिरण्याची, तलवारबाजी  करण्याची आणि पुरुषांप्रमाणेच बेधडक घोडेस्वारी देखील करण्याची क्षमता प्राप्त झाली. तेव्हापासून ही साडी महिलांसाठी एक सुरक्षित वस्त्र म्हणून उदयास आले. 

झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, अहिल्याबाई होळकर या क्रांतिकारी महिलांनी नऊवारी नेसूनच रणांगण गाजवले आणि इतिहास घडवलेला आहे. तसेच महिलांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांनी देखील नऊवारीतच आपले कार्य केले.

Maharashtrian Wedding Tradition: Nauvari Saree
Maharashtrian nauvari

“काष्ट” हा शब्द साडीच्या पाठीला बांधण्याच्या कृतीला सूचित करतो. हा पोशाख केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यानच परिधान केला जात नसून अनेक महिला आजही नऊवारी परिधान करून शेतात काम करतात.

आजच्या आधुनिक युगामध्ये देखील अनेक उच्च पदावरील महिला नऊवारी साडी परिधान करून बिजनेस करतात.

अलिकडच्या काळात, नऊवारी साड्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही लोकप्रियता मिळवली आहे. या नऊवारी बहुतेकदा फॅशनच्या धावपट्टीवर दिसतात आणि रेड कार्पेट इव्हेंटसाठी सेलिब्रिटींही परिधान करतात.

नऊवारी साडीचे प्रकार | Types of nauvari saree | Nauvari sadi che prakar

  • मराठमोळी नऊवारी | Traditional nauvari
  • साधी नऊवारी | simple nauvari
  • कोल्हापुरी नऊवारी | kolhapuri nauvari
  • राजलक्ष्मी नऊवारी | Rajlaxmi nauvari
  • पेशवाई नऊवारी | Peshwai Nauvari
  • एक धोती नऊवारी | Ek dhoti nauvari

लग्नामध्ये नवरीसाठी नऊवारी साडी | Wedding marathi bridal nauvari saree

Bridal Nauvari Saree - Traditional Maharashtrian Wedding Attire in Rich Colors and Intricate Designs
Bridal Nauvari Saree

भारता मधील विवाह सोहळे हे अतिशय आनंददायी सोहळे असतात. लग्न म्हणजे एका मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. या दिवशी नवरी (bridal) पारंपरिक पोशाखाचा पेहराव करते. नऊवारी ही महाराष्ट्रीयन पारंपारिक पोशाख आहे. या साड्या प्रत्येक वधूच्या पसंतीचा पोशाख बनत आहेत. पारंपरिक पद्धतीने पोशाख परिधान करून सर्व लग्नातील विधी पार पाडले जातात.

Timeless Charm of Maharashtrian Nauvari Saree
nauvari saree for wedding

लग्नाच्या हळदी मुहूर्तासाठी पिवळी नऊवारी साडी | Yellow Nauvari Saree for Wedding | Maharashtrian bridal attire

लग्न समारंभामध्ये नवरी चे पारंपारिक सौंदर्य खुलवण्यासाठी पिवळी नऊवारी साडी एक उत्तम पर्याय आहे. भारतीय परंपरांमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्त्राला विशेष महत्त्व आहे. विवाह सोहळा, शुभ प्रसंगी, सण, उत्सव आणि इतर आनंदाच्या प्रसंगी या रंगाला विशेष महत्त्व असते. पिवळ्या नऊवारी साड्या विशेषत: लग्न समारंभामध्ये, हळद आणि मेहंदी या कार्यक्रमांमध्ये नवरी चे सौंदर्य वाढवतात.

दागिन्यांसह नऊवारी साडी लुक | Maharashtrian bride nauvari saree look with jewellery

Traditional jwellery on nauvari saree
jwelllery on nauvari

नऊवारी हा पारंपारिक वस्त्र असल्यामुळे या साडी वरती तिला शोभेल असेच पारंपरिक दागिने परिधान केल्याने साडीवरील लुक अतिशय सुंदर दिसतो. चला तर बघुया खालील काही महत्त्वपूर्ण टिप्स!

  • या साडीवरती आपण एक पारंपरिक हार परिधान करू शकतो. उदाहरणार्थ.. कोल्हापुरी साज, मोत्याचे दागिने, पारंपरिक सोन्याचे हार तसेच कुंदनचे हार देखील वापरू शकतो.
  • साडी वरती सूट होतील अशा पारंपरिक बांगड्या, हिरवा चुडा, पाटल्या, बाजूबंद, मोत्याच्या बांगड्या वापरू शकतो.
  • कानातल्यांची निवड करताना पारंपारिक झुमके, चांदबाळी किंवा आधुनिक बोल्ड लुक साठी लांब झुमके देखील वापरू शकता.
  • नथी शिवाय नऊवारी ही अपूर्णच. त्याशिवाय तिचा पारंपरिक लुक पूर्णच होत नाही. त्यामुळे एखादी छानशी मोत्याची नथ किंवा आवडीनुसार नोज पिन घालावी.
  • त्यानंतर एखादी छान पारंपरिक व आधुनिक जोड असलेली हेअर स्टाईल करून त्यावर गजरा माळावा. नसल्यास हेअर ॲक्सेसरीज देखील उत्तम पर्याय ठरेल. 
  • कपाळावर सुंदर टिकली लावून आपण आपल्या सौंदर्यात अधिकच भर घालू शकता.

नऊवारी साडीची किंमत किती असते ?

नऊवारी साडीची किंमत फॅब्रिक, डिझाइन आणि कारागिरीवर अवलंबून असते. साधारणपणे, एक साधी कॉटन नऊवारी साडी सुमारे 500 ते 5000 रुपये पर्यंत असू शकते. 

सिल्क आणि डिझायनर नऊवारी साड्यांची किंमत 5000 ते 50,000 भारतीय रुपये किंवा त्याहूनही जास्त वर्क आणि फॅब्रिकवर अवलंबून असू शकते. खरेदीचे ठिकाण आणि ब्रँड किंवा डिझायनर यानुसार किंमती बदलू शकतात. खरेदी करण्यापूर्वी फॅब्रिकची गुणवत्ता आणि कारागिरी तपासण्याची शिफारस केली जाते.

जर आपल्याला नऊवारी पैठणी खरेदी करायची असेल तर त्या साडीची किंमत तितकीच अधिक असू शकते. साडी वरील नक्षीकाम आणि फॅब्रिक नुसार साडीची किंमत ठरते.

नऊवारी साडी कशी नेसायची | Nauvari Sadi Kashi nesaychi | how to wear nauvari

नऊवारी साडी नेसण्याच्या काही पारंपारिक पद्धती आहेत. त्यानुसार खालील काही टिप्स आपणास मदत करतील.

  • प्रथम साडीच्या पदराचे विरुद्ध टोक कंबरे भोवती गुंडाळा आणि कंबरेला मध्यभागी नाभीच्या अगदी खाली गाठ मारावी. 
  • साडीच्या पदराचा भाग कंबरे भोवती गुंडाळून आपल्या डाव्या खांद्यावर टाकावा. आपल्याला हवा तेवढा लांबीचा पदर काढावा. आणि पिन लावून घ्यावे.
  • त्यानंतर मध्यभागी असलेला सर्व कपड्याचे मिऱ्या (Pleats) बनवून घ्यावे आणि कंबरेच्या मधोमध टक करावा. जशा आपण साडीच्या प्लीट्स नाभीच्या खालील भागात खोचतो.
  • त्यानंतर मिऱ्या खालच्या बाजूने दोन्ही बाजूने एकसारखे करून अगदी मधोमध पकडा आणि दोन्ही पायांच्या मधून पाठीमागे ओढा त्यानंतर पाठीमागे त्याची मिऱ्या तयार करा दोन्ही काठ सरळ वरती एक सारखे येतील या पद्धतीने तो काष्टा कंबरेच्या मागच्या बाजूला मधोमध खोचा. आपल्याला हवे असल्यास योग्य ठिकाणी साडी पिन लावून साडी निसटणार नाही, याची खात्री करा. अशाप्रकारे आपण नऊवारी साडी परिधान करू शकतो.

रेडीमेड नऊवारी साडी | Readymade nauvari saree

Stylish Readymade Nauvari Saree for Women
readymade nauvari

जर आपल्याला पारंपारिक नऊवारी साडी परिधान करता येत नसेल तर यावरती उपाय म्हणजे मार्केटमध्ये रेडीमेड नऊवारी साड्या सुद्धा उपलब्ध आहेत. आणि या रेडीमेड साड्या नेसायला ही अगदी सोप्या असतात. आपल्याला बाजारामध्ये अनेक पद्धतीच्या रेडीमेड नऊवारी साड्या शिवून किंवा तयार करून भेटतात. या नऊवारी साड्यांची किंमत त्यांच्या फॅब्रिकच्या गुणवत्तेनुसार आणि नऊवारी शिवण्याच्या पद्धतीनुसार ठरते.

रेडीमेड साड्या नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीची तयार केलेली नऊवारी साडी घ्याल, ती साडी परिधान कशी करायची हे आधी समजून घ्या.

हे सुद्धा वाचा :-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....

wedding outfit ideas for womens
फॅशनलाइफस्टाइल

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा याचा विचार करताय का? इथे आहेत महिलांसाठी काही भन्नाट कल्पना

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा? हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला असतो. आपल्या भारतीय...

konrad silk saree
लाइफस्टाइलफॅशन

दक्षिण भारतातील टेम्पल साडी – कोनराड सिल्क साडी | Konrad Silk Saree

कोनराड सिल्क साडी, ही साडी भारतातील सर्वात सुंदर साड्यांपैकी एक साडी आहे....