तामिळनाडू राज्यातील कांचीपुरम या गावामध्ये बनवली जाणारी कांजीवरम साडीचे प्रकार, कलर, डिझाइन आणि इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये gurudevd टीम आपणाला देत आहे. ही माहिती साडी खरेदीपूर्वी माहिती असणे गरजेचे आहे. कांजीवरम सिल्क साडी ही सध्या फारच ट्रेंडमध्ये चालू आहे.
दक्षिण भारतातील (South Indian saree ) या साड्या सध्या सर्वच महिलांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक महिलेला हवीहवीशी वाटणारी ही एक अशी सुंदर साडी आहे की जिला परिधान केल्यावर अतिशय सामान्य महिला देखिल खूप सुंदर दिसते. उत्तम प्रकारच्या रेशीम आणि जरी मध्ये बनवलेली ही एक अतिशय सुंदर साडी आहे. हातमागावरती (Handloom) बनवलेल्या या कांजीवरम चा नंबर भारतातील सर्वात महागड्या साड्यांमध्ये लागतो. या साडीचे विशेष आकर्षण ठरते तिचे मोठे आणि कॉन्ट्रास्ट काठ. कांजीवरम ला 2005 पासून “भौगोलिक स्थानदर्शक” प्रमाणपत्र देऊन संरक्षण देण्यात आले आहे.
कांजीवरम साडी चा इतिहास | History of Kanjivaram Silk Sarees
- कांजीवरम सिल्क साडी चा इतिहास हा पौराणिक कथांमध्येही सापडतो. या साडीचे विणकर हे ऋषी मार्कंडाचे वंशज आहेत, जे स्वतः देवांसाठी कपडे विणत होते.
- कांजीवरम च्या विनकामाला 400 हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. कृष्णदेवालयाच्या ( विजयनगर साम्राज्याच्या ) काळात या कलेचा जन्म झाला.
- हिंदू पौराणिक कथेनुसार देवांग आणि सालीगर हे दोन प्रमुख विनकरी समुदाय आंध्र प्रदेशातून आले होते आणि कांचीपुरम या गावांमध्ये ते स्थायिक झाले.
- देवांग आणि सालीगर या विणकरी समुदायाने सुंदर अशी रेशीम साडी विणण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या मंदिरांवरील आकृत्या आणि नक्षीकाम देखील त्या साडीमध्ये विणल्या आणि अशा या भव्य दिव्य साडी चा प्रवास सुरू झाला.
- कांजीवरम सिल्क साडी च्या भव्यतेमुळे आणि नक्षीकामामुळे या साडीला लवकरच लोकप्रियता मिळाली.
कांजीवरम साडी बद्दल माहिती | Information about Kanjivaram silk saree
- कांजीवरम ही हातमागावर ती बनवली जाते. ही साडी शुद्ध लाल रेशमी धाग्यापासून बनवली जाते. ही साडी विणण्यासाठी अति तलम रेशमा चा वापर केला जातो. उभे आणि आडवे दोन्ही धागे दुहेरी वापरतात.
- चंद्र, सूर्य, रथ, मोर, पोपट, राजहंस, सिंह, नानी, आंबे, पाने, गोल किंवा चौकोनामध्ये जाई- जुईची कळी या प्रकारची नक्षीकामे या साडी मध्ये केली जातात.
- एक साडी बनविण्यासाठी 15 दिवस ते 1 महिना इतका वेळ लागतो. साडी वरील नक्षी कामावरून तिचा विणण्याचा कालावधी ठरतो. साडीवरती अगदीच कलाकुसर असेल तर ती साडी तयार होण्यासाठी जास्त वेळ देखील घेऊ शकते, जितका जास्त वेळ तितकी सुंदर अशी साडी तयार होते.
- या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा पदर आणि काठ वेगळे विणले जातात, आणि शेवटी सर्व एकत्र येतात. दोन्ही भागांना जोडणाऱ्या झिगझॅक पॅटर्नला पिटणी असे म्हणतात. कांजीवरम सिल्क साडी चा मेन बॉडीचा कलर हा पदर आणि काठांपेक्षा वेगळा असतो. या साड्या बहुदा महागच असतात. साडीचा दर्जा आणि धाग्यांची डिझाईन यानुसार साडीची किंमत ठरते.
- ही साडी मजबूत आणि सर्वात टिकाऊ मानली जाते तीन रेशमी धाग्यांची साडी चांदीच्या तारेने गुंफलेली असल्याने ती अधिक टिकाऊ बनते. एका कांजीवरम चे वजन 2 kg इतके असू शकते.
- जर साडी ची किंमत कमी असेल तर ती नक्कीच अस्सल कांजीवरम नाही हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.
कांजीवरम सिल्क साडी चे प्रकार | Types of Kanjivaram Silk Sarees
1. पारंपारिक कांजीवरम साडी | Traditional Kanjivaram Saree
पारंपारिक कांजीवरम साडी चे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे सुंदर चेक्स, नानी किंवा गोल चक्राचे नक्षीकाम, मंदिरावरील नक्षीकामांनी विणलेली किनार विणकर या प्रकारचे नक्षीकाम हाताने विणतात. या साड्या वजनाने हलक्या असतात.
2. कोरवाई कांजीवरम साडी | Korvai Kanjivaram Saree
या साडी चे विणकर हे दक्षिण भारतातील कांचीपुरम येथील आहे. ही साडी शुद्ध नैसर्गिक रेशमापासून हाताने विणली जाते आणि विणकर हे पुराणिक कला आणि नैसर्गिक नक्षीकाम साडी वरती विणतात.
3. जरी ब्रोकेड कांजीवरम साडी | Zari Brocade Kanjivaram Sarees
जरी वर्क हे ब्रोकेड कांजीवरम साडीची सुदंरता वाढवते. ही साडी तिच्या डिझाइन मुळे सर्वात जास्त पसंतीच्या कांजीवरम साड्यांपैकी एक आहे. काठावरील जरी वर्क मुळे महिलांच्या पसंतीस ही साडी उतरते.
4. बॉर्डर नसलेली कांजीवरम साडी | Without Border Kanjivaram Sarees
बॉर्डरलेस कांजीवरम साड्या या परंपरेला आधुनिकतेची जोड देतात. ज्या स्त्रियांना साडीला बॉर्डर आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पारंपरिक साडीपेक्षा काहीतरी वेगळा पर्याय ही साडी महिलांना देते.
5. कांचीपट्टू कांजीवरम साडी | Kanchipattu Kanjivaram Sarees
पट्टु कांजीवरम साड्या त्यांच्या अवघड डिझाईन्स आणि शुद्ध तुती सिल्क वापरून विणलेल्या मोहक नमुन्यांसाठी ओळखल्या जातात. “पट्टु” हा शब्द साडी मध्ये विणलेल्या “बुटीस” किंवा लहान डिझाइन साठी वापरला जातो. या प्रकारच्या साड्या नाजूक आणि लक्षवेधी लहान गोलाकार बुटीस साठी ओळखल्या जातात.
6. चेक्ड कांजीवरम साडी | Checked Kanjivaram Sarees
चेक्ड साडी ही या कांजीवरम मधील महत्वाचा प्रकार आहे. या साड्या मधील चेक्ड डिझाइन आणि रंग त्यामुळे त्या नेहमी स्टाईलमध्ये असतात. बहुतेक सण समारंभासाठी परिधान केल्या जाणाऱ्या कांजीवरम साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या चेकमध्ये येतात. या साड्या मधील चेक दोन रंगामध्ये असतात.
7. क्लासिक कांजीवरम साडी / कांचीपुरम पट्टू साडी | Classic Kanjivaram / Kanchipuram Pattu Sarees
क्लासिक कांजीवरम पट्टू साड्या कोणत्याही प्रकारच्या समारंभामध्ये महिलांचे सौंदर्य खुलवण्यामध्ये कमी पडत नाही. या साड्या पारंपारिकपणे रुंद आणि विरोधाभास असलेल्या किनारीमध्ये विणल्या जातात ज्यामुळे ती आगळे वेगळे रूप पाहून महिला भाराऊन जातात. ही साडी इतकी मजबूत असते की साडी फाडली तरी बॉर्डर साडीपासून वेगळी करता येत नाही.
8. थ्रेड ब्रोकेड कांजीवरम साडी | Thread Brocade Kanjivaram Saree
थ्रेड ब्रोकेड कांजीवरम साड्या सर्वात जुन्या पारंपारिक विणकाम पद्धतींपैकी एक वापरून विणल्या जातात, ज्यामध्ये शुद्ध सोने आणि रेशीम धाग्यांचा वापर करून ती बनवली जाते. ब्रोकेड कांजीवरम सुंदर रंगछटा तयार करण्यासाठी सोनेरी आणि रेशमी धागे एकत्र करून विणकर काळजीपूर्वक ती तयार करतात. ही एक अवघड आणि कष्टाची प्रक्रिया आहे.
9. टेंपल बॉर्डर कांजीवरम सिल्क साडी | Temple Border Kanjivaram Silk Saree
साडीच्या काठावर किंवा पल्लू यांच्यावरती मंदिराच्या किनारी (त्रिकोनी किंवा झिगझॅग) डिझाइन विणकर विणतात त्यामुळे या साड्या टेंपल बॉर्डर कांजीवरम सिल्क साड्या म्हणून ओळखली जाते.
10. फुलांची विणलेली कांजीवरम सिल्क साडी | Floral Weave Kanjivaram Silk Saree
या साडीवरती सर्वदूर विखुरलेल्या फुलांच्या किंवा पेस्ली मोटिफमध्ये डिझाइन तयार केल्या जातात, आणि त्याला जरी पल्लू ची जोडीमुळे महिलांना ही साडी फार आवडते.
कांजीवरम मधील फेमस कलर | Famous Color In Kanjivaram Saree
कांजीवरम साडीच्या समृद्ध रंगामध्ये मागणीनुसार मोठया प्रमाणात बदल होत असतात. कांजीवरम साड्यांमधील काही लोकप्रिय आणि क्लासिक रंग खालील लिस्ट मध्ये पाहूया.
- लाल कांजीवरम साडी | Red Kanjivaram Saree : लाल हा भारतीय संस्कृतीतील एक उत्कृष्ट आणि शुभ रंग आहे. लाल कांजीवरम साड्या बहुतेक वेळा लग्न आणि इतर महत्त्वाच्या समारंभांसाठी निवडल्या जातात.
- हिरवी कांजीवरम साडी | Green Kanjivaram Saree : हिरवा रंग समृद्धी आणि सुसंवादाचे प्रतीक आहे. हिरव्या कांजीवरम साड्या विविध सणांच्या प्रसंगी लोकप्रिय आहेत.
- पिवळी कांजीवरम साडी | Yellow Kanjivaram Saree : पिवळा रंग चमक आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. सण आणि समारंभ यांसारख्या कार्यक्रमांसाठी पिवळ्या कांजीवरम साड्या निवडल्या जातात.
- जांभळी कांजीवरम साडी | Purple Kanjivaram Saree : जांभळा हा शाही रंग आहे. जांभळ्या कांजीवरम साड्या सहसा विशेष प्रसंगी परिधान केल्या जातात.
- नारंगी कांजीवरम साडी | Orange Banarasi Saree : नारंगी रंग उत्साह आणि ऊर्जा दर्शवते. केशरी कांजीवरम साड्या सणाच्या प्रसंगी लोकप्रिय आहेत.
- ब्लू कांजीवरम साडी | Blue Banarasi Saree : निळ्या कांजीवरम साड्या विविध छटामध्ये येतात आणि त्या पारंपारिक कार्यक्रमांसाठी निवडल्या जातात.
- सफेद कांजीवरम साडी | White Kanjeevaram Saree : ही साडी पूर्ण सफेद असते आणि साडीची बॉर्डर ही जरी वर्क, लाल आणि ग्रीन या कलर टोन मध्ये असतात. म्हणजेच बॉर्डरचा कलर हा सफेद रंगाच्या विरुद्ध कलर मध्ये असतो.
कांजीवरम साडी बनवण्यासाठी लागणारी जरी आणि रेशीम
- शुद्ध तुती (Mulberry silk) चे रेशम ही रेशीम साडी बनवण्यासाठी वापरतात.
- गुजरातमधील शुद्ध सोने आणि चांदी ची जरी वापरली जाते.
- या धाग्याचा कडकपणा आणि जाडी टिकविण्यासाठी ते वापरण्यापूर्वी हे धागे तांदळाच्या पाण्यात बुडवून उन्हामध्ये सुकवले जातात, नंतर सिल्क थ्रेड थीम सिल्वर वायरला इंटरलॉक केले जाते यानंतर विनकाम पूर्ण करण्यासाठी सोनेरी धागा वापरला जातो.
अस्सल कांजीवरम सिल्क साडी कशी ओळखावी | How to Identify a Pure Kanjivaram Saree ?
काही साड्यांमध्ये खऱ्या जरी ऐवजी कृत्रिम जरी देखील वापरली जाते. बाजारामध्ये देखील कृत्रिम कांजीवरम मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, जी मशीनमध्ये बनवली जाते. आणि तिची जर ही अस्सल नसते.
- सर्वात आधी साडीचा कपडा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, यासाठी साडी हाताने थोडीशी खरवडून बघावे.
- जर साडी हाताला मऊ लागली तर समजावी ती अस्सल साडी आहे.
- कांजीवरम सिल्क साडी ला एक वेगळीच चमक असते या साडीला बघताच क्षणी नजरेमध्ये एक वेगळीच चमक भरते.
- प्रत्येक कांजीवरम सिल्क साडी मध्ये लाल सिल्कचा धागा हा असतो, त्याशिवाय हि साडी पूर्णच होत नाही.
- कांजीवरम सिल्क साडी बनवण्यासाठी उत्तम प्रकारची सिल्क आणि जरी वापरली जाते, त्यामुळे या साडीचे वजन जास्त नसते.
कांजीवरम सिल्क साडी ची अस्सल जर कशी ओळखावी?
- ही साडी रेशीम धाग्याबरोबरच यामधील जरी मुळे देखील अगदी उठावदार दिसते, त्यामुळे या साडी मधील जर तपासणे देखील महत्वाचे आहे.
- साडीची जर थोडीशी खेचून त्यामध्ये लाल धागा असेल तर ती अस्सल जर समजावे, लाल धागा न दिसता पांढरा किंवा वेगळा कलरचा धागा दिसला तर ती अस्सल जर नाही हे लक्षात घ्यावे.
- या साडी चा धागा हा लाल च रंगाचा असतो. लाल रेशमी धागा चांदीच्या धाग्याबरोबर गुंफला जातो आणि नंतर 22 कॅरेट शुद्ध सोन्या मध्ये हा धागा बुडवतात.
- आणि जर ओळखण्याचा अगदी शेवटचा पर्याय म्हणजे या साडीचे थोडेसे धागे जाळून बघा, जर साडीचे धागे पेटवल्यानंतर राखीचा गोळा तयार होत असेल आणि तो गोळा रगडल्यानंतर लहान असा गोळा मिळेल त्याचा वास चांबड्यासारखा किंवा जळालेल्या केसांसारखा आल्यास ती साडी अस्सल समजावी.
- कृत्रिम रेशीम साडीचे धागे जाळल्यानंतर त्याची राख तयार होत नाही आणि वासही येत नाही.
नववधूसाठी ( नवरी साठी ) कांजीवरम | Kanjivaram saree for the bride
आज-काल बऱ्याच नववधू लग्नासाठी कांजीवरम सिल्क साडीला च पसंती देतात. ही साडी परिधान केल्याने नववधू अगदी राजकन्याच दिसते. पूजेसाठी, लग्न विधीसाठी ही साडी अतिशय उत्तम असते. तसेच या पारंपरिक साड्यांची फॅशन ही कधीच संपत नाही, या साड्यांची फॅशन चिरंतर असते.
अस्सल कांजीवरम सिल्क साडी किंमत | Pure Kanjivaram silk saree price range
- कांजीवरम ची किंमत ही 2500 हजारांपासून 6 लाखांपर्यंत आहे आहे.
- आपल्याला हवी तशी साडी आपण बनवून घेऊ शकतो आणि त्यानुसार तिची किंमत कमी किंवा जास्त होऊ शकते.
- कांजीवरम सिल्क साडी मध्ये चांगल्या प्रतीचा सिल्क आणि जरी वापरली जाते त्यामुळे या साडीची किंमत जास्त असते.
कांजीवरम वरती दागिने | Jewellery on Kanjivaram saree
कांजीवरम वरती आपण पारंपरिक पद्धतीचे दागिने वापरू शकतो. तसेच या साडीवरती टेम्पल ज्वेलरी अतिशय सुंदर दिसते. सध्या ट्रेंडमध्ये टेम्पल ज्वेलरी या साडीवर ती अतिशय सुंदर दिसते.
कांजीवरम आणि कांचीपुरममध्ये काय फरक आहे. | what is difference between Kanjivaram and Kanchipuram ?
कांचीपुरम हे एका गावाचे नाव आहे आणि या ठिकाणी जी साडी तयार केली जाते त्या साडीला कांजीवरम असे म्हणतात किंवा कांचीपुरम साडी असे ही म्हणतात.
हे सुद्धा वाचा :-
Leave a comment