मराठी उखाणे

Haldi Kunku Ukhane Marathi | हळदी कुंकू उखाणे

Haldi Kunku Ukhane Marathi
Haldi Kunku in Ukhane Marathi

मराठी संस्कृतीमध्ये हळदी कुंकू (Haldi Kunku) वाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या समारंभादरम्यान उखाणे (Ukhane) घेण्याला फार महत्व असते. याला मकर संक्रांती पासून सुरुवात होते तसेच सुहासिनींना आपल्या घरी बोलावून त्यांना वान देऊन हळदी कुंकवाची देवाणघेवाण करतात. तसेच वाण स्वरूपात एक भेटवस्तू दिली जाते.

अंबाबाईच्या साडीला सोन्याची जरी
अंबाबाईच्या साडीला सोन्याची जरी
— रावांचे नाव घेते हळदी कुंकू ठेवलेल्यांच्या घरी
— रावांचे नाव घेते हळदी कुंकू ठेवलेल्यांच्या घरी


सासरे माझे मायाळू
सासू माझी होशी
— रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाच्या दिवशी


बागेची शोभा वाढवण्यासाठी
कष्ट करतो माळी
— रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाच्या वेळी


काळी कपिली
गाय चरत होती वनात
— रावांचं नाव घेते
संक्रांतीच्या वाणात


गणपतीला वाहते दुर्वा
विठ्ठलाला वाहते तुळस
— रावांचे नाव घेण्याचा
मला नाही आळस


Haldi kunku quotes in marathi

ननंद माझी ब्युटीफूल
जाऊ माझी ग्रेट
पण
— रावांच्या आई म्हणतात
तुच माझी फेवरेट


निरोगी आरोग्यासाठी रोज
फळ खावे ताजे
— रावांसारखे पती मिळाले
हेच सौभाग्य माझे


गुलाबाचे फुल
दिसायला ताजे
— रावांसारखे पती मिळाले
हेच सौभाग्य माझे


मावळला सूर्य
चंद्र उगवला आकाशी
— रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाच्या दिवशी


हळदी कुंकवासाठी छोटे आणि सुंदर उखाणे

रातराणीचा सुगंध
दरवळतो संध्याकाळी,
… रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाच्या वेळी. 


निसर्गनिर्मितीच्या वेळी
सूर्यनारायण झाले माळी,
… रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाच्या वेळी.


रामाच्या मंदिराला
सोन्याच्या पानाचे तोरण,
…  रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाचे कारण.


पायामध्ये घातली जोडवी
गळ्यात घातलं डोरलं,
… रावांचे नाव
माझ्या कुंकवावर कोरलं.


हळदी कुंकवाच्या ताटावरती
रुमाल टाकते विणून,
…  रावांचे नाव घेते
अक्षदा पडल्या म्हणून.


Haldi Kunku Ukhane

लावत होते कुंकू
त्यात पडला मोती,
… राव माझे पती
आणि मी त्यांची सौभाग्यवती.


महादेवाला आवडते बेल 
श्री विष्णूला आवडते तुळशी,
… रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाच्या दिवशी.


कुंकू लावते ठळक
हळद लावते किंचित,
… रावांसारखे पती मिळाले
हेच माझे पूर्व जन्माचे संचित.


हिमालय पर्वतावर
बर्फाच्या राशी,
… रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाच्या दिवशी.


चंदनाच्या झाडाला
नागिणीचा वेढा,
… रावांच्या नावाने
भरला हिरवा चुडा.


पूजेच्या साहित्यात
अगरबत्ती चा पुडा,
… रावांच्या नावाचा भरला
हातात हिरवा चुडा.


हळदी कुंकवाच्या दिवशी
घातला सुहासिनींनी वेढा,
…  रावांचे नाव घेते
आता तरी माझी वाट सोडा.


हळदी कुंकू लावते सगळ्यांना
पाया पडते वाकून,
… रावांचे नाव घेते
तुमचा मान राखून.


महालक्ष्मीला वाहते
हळदी- कुंकू, फुल आणि पान,
…रावांचे नाव घेते
ठेवून सर्वांचा मान.


शेवंतीच्या फुलांची
वेणी गुंफतो माळी,
…  रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाच्या वेळी.


हळदी कुंकवाचे ठसे
लावते दारावर,
आणि सर्वांसमोर मिरवते तोऱ्यात
  …. रावांच्या जोरावर.


देव्हाऱ्यातील देवांना
फुले वाहते ताजे,  
…  रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाच्या दिवशी
किती सौभाग्य माझे.


अंगणामध्ये टाकला सडा
त्यावर काढली रांगोळी,
… रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाच्या वेळी.


नाव ऐकण्यासाठी झाले सर्व गोळा
करू नका  दाटी,
…. रावांचे नाव घेते
खास तुमच्यासाठी.


हळद लावते, कुंकू लावते
वाण घेते घोळात,
… रावांचे नाव घेते
सुवासिनींच्या मेळात.


निळे निळे आकाश
त्यात पक्षी उडतात छान,
… रावांचे नाव घेऊन
ठेवते सर्वांचे मान.


सुखी संसारासाठी
केला होता देवाला नवस,
…. रावांचे नाव घेते कारण
आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.


कोल्हापूरची लक्ष्मी,
तुळजापूरची भवानी,
… रावांचे नाव घेते
मी त्यांची अर्धांगिनी.


पूजेच्या ताटामध्ये
हळदी कुंकवाचा पुडा,
…. रावांच्या नावाने भरला
सौभाग्याचा हिरवा चुडा.


गाणगापूरच्या मंदिरात
असतात श्री गुरुदेव दत्त,
… रावांच नाव घेते
हळदी कुंकवाच निमित्त,


हळदी – कुंकू आणि हिरवा चुडा
आहे सौभाग्याची शान,
… रावांचे नाव घेते
ठेवून सर्वांचा मान.


कपाळाचं कुंकू
जशी चंद्राची कोर,
…. रावांचे नाव घेते
माझे भाग्य किती थोर.


खरेदी करण्यामध्ये
बायका असतात हौशी,
… रावांचे नाव घेते
हळदी कुंकवाच्या दिवशी.


हिरव्या – हिरव्या बांगड्या
छान – छान पैंजण,
… रावांचे नाव घेते
ऐका सारे जण.


महादेवाच्या मंदिरात
समया लावल्या 360,
…. रावांच्या जीवावर
माझा सौभाग्याचा थाट. 


चांदीच्या देव्हाऱ्यात
बसवली सोन्याची मूर्ती,
… रावांशी लग्न करून
झाली सर्व इच्छापूर्ती.


महादेवाच्या पिंडीवरती
वाहिले बेल,
…. रावांचे आणि माझे नाते
कधीच होणार नाही फेल.


ते नाही परश्या
आणि मी नाही आरची,
…रावांशी लग्न करून मी झाले
( आडनाव )यांच्या घरची.


चांदीचे जोडवे आहे
सौभाग्याची खून,
… रावांचे नाव घेते 
…. यांची सून.


जीवनाच्या प्रवासामध्ये
नवीन प्रश्न असतात प्रत्येक दिवशी,
  … राव आहे
स्वभावाने फारच हौशी. 


महालक्ष्मीला वाहण्यासाठी
कमळाचे फुल तोडले,
… रावांसाठी
मी आईबाप सोडले.


सुखांमध्ये आनंदी आणि 
दुःखामध्ये धैर्याने जीवन जगले,
… रावांच्या सहवासात
मी सदैव हसले.


मनाच्या गाभाऱ्यात
सदैव दत्तगुरूंची मूर्ती,
… रावांची
सगळीकडे पसरो कीर्ती.


पुढे अजून उखाणे पहा (Read More)

हे सुद्धा वाचा :-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

शेतकरी उखाणे
मराठी उखाणे

शेतकरी नवरदेवासाठी कॉमेडी उखाणे | comedy ukhane for farmers

शेतकऱ्यांसाठी लग्नातील फनी उखाणे शेतकरी महिलांसाठी सुंदर उखाणे हे देखील वाचा –

नवरदेवासाठी उखाणे
मराठी उखाणे

नवरदेवासाठी उखाणे सोपे, छोटे आणि सुंदर

भारतातील लग्न समारंभामध्ये उखाणे घेण्याचा फार आनंदी सोहळा असतो. या सोहळ्यांमध्ये खास...

Funny Ukhane in Marathi for Male
मराठी उखाणे

Funny Ukhane in Marathi for Male | पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे

हे मजेदार Comedy आणि Funny उखाणे कोणत्याही प्रकारच्या समारंभामध्ये बायकोसाठी, मित्रांसाठी आणि...

Funny Ukhane in Marathi for Female
मराठी उखाणे

Best Comedy And Funny Ukhane in Marathi for Female | Comedy Ukhane Marathi

Funny आणि Comedy मराठी उखाणे तुम्ही कोणत्याही समारंभामध्ये किंवा समारंभाविना नवऱ्यासाठी, मित्रासाठी...