मराठी लेख

मकर संक्रांत म्हणजे काय? ती का साजरी केली जाते? | Why celebrate makar sankranti?

People celebrating Makar Sankranti in traditional Marathi attire.

मकर संक्रांत (makar sankranti) हा प्रेम संवर्धनाचा सण. नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात १४ किंवा १५ तारखेला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकरसंक्रांत किंवा मकर संक्रमण असे म्हणतात. सूर्याचे संक्रमण टिळक पंचांगाप्रमाणे १० जानेवारीला होते तर श्रीदाते पंचांग प्रमाणे १४ किंवा १५ जानेवारीला होते. या दिवशी दक्षिणायन संपून उत्तरायण चा पुण्यपर्व काळाचा प्रारंभ होतो.

भोगी, संक्रांत आणि किंक्रांत (करीदिन) हे तीन वेगवेगळे दिवस असतात त्यामुळे या तीन दिवशी संक्रांत संपन्न केली जाते. संक्रांत हे एक देवी स्वरूप असल्याने संक्रांतीने शंकासुर व क्रीक्रांतीने दुसऱ्या दिवशी किंकरासूर या दोघांचा वध केल्याने हा सन साजरा केला जातो अशी पुराण कथा आहे. देवी तिच्या नेहेमीच्या रूपाप्रमाणे प्रसन्न व मंगलदायक दिसत नसून लांब होठ दीर्घ नाक एक तोंड नऊ बाहू असे तिचे स्वरूप असते. दरवर्षी तिचे वाहन अस्र, वस्त्र, शस्त्र ,अवस्था, अलंकार वेगवेगळे असते. आपले अलंकार व वस्त्र यातून संक्रांत भविष्यकाळ सुचवीत असते.

संक्रांत ज्या दिशेने येते तिकडे समृद्ध आणि जिकडे जाते तिकडे संकट येते अशी रूढ भावना आहे. संक्रातीच्या दिवशी पितरांची पूजा करावी कारण तो एक योग्य श्राद्ध दिवस असतो. तसेच त्या दिवशी तिळाचे व उदकाचे दान करावे.

संक्रांतीच्या काळ हा थंडीचा असलयाने खालील काही पौष्टिक पदार्थ खावेत.

  • स्निग्ध : तीळ, तूप, लोणी
  • पौष्टिक: तूप, ओले खोबरे, खारीक
  • भाज्या : कोथिंबीर, पावटा, वांगी, गाजर, घेवडा बरोबर अनेक भाज्या एकत्रित करून केलेली भाजी खावी.
  • उष्ण: गुळ व बाजरीची भाकरी

या सणाला स्नानाच्या वेळेस त्वचेला तिळाची पेस्ट लावावी व पाण्यात तीळ टाकून स्नान करावे. उष्ण व लोहतत्व असलेला गुळ तिळासोबत आणि बाजरीच्या भाकरीवर तीळ टाकून खातात. कोकणात या दिवशी इडली व नारळाचे दूध करतात. देशामध्ये गुळाची पोळी व तूप खातात तसेच उत्तरेत या सणाला खिचडीसंक्रांत असे नाव आहे कारण उत्तरेत लोक मुगडाळ व तांदूळ यांची खिचडी करून खातात.

मकर संक्रांतीदरम्यान घडणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी 

संक्रांती म्हणजेच संक्रमण आणि संक्रमण याचा अर्थ असा होतो की क्रमन करून जाणे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. पौष महिन्यातील मकर संक्रमण हे उत्तरायणाचा आरंभ करते ( म्हणजेच सूर्य हळूहळू उत्तर दिशेला सरकतो). उत्तरायणमध्ये दिवस हळूहळू मोठा होत जातो. तर आषाढातले कर्क संक्रमण हे दक्षिणायणाचा ( म्हणजेच सूर्य हळूहळू दक्षिणेला सरकतो) आरंभ करते. दक्षिणायणामध्ये दिवस हळूहळू छोटा होत जातो. सूर्याच्या या क्रमन करण्याच्या भासमानाला क्रांतीवृत्त असे देखील म्हणतात.

संक्रांतीच्या दिवशी सुगडं पूजण्याची प्रथा 

संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सुगडं पुजण्याची प्रथा आहे. या सुगड्यामध्ये पाच खण आणले जातात ( मातीचे छोटे भांडे) या खनाला हळदी – कुंकवाचे पाच बोटे लावले जातात. त्यानंतर या खणाच्या गळ्याभोवती पांढरा दोरा सुतवला जातो ( गुंडाळला जातो). खनाच्या आत मध्ये हरभरा, गव्हाची ओंबी, बिब्याची फुले, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, गाजर, तीळ, ज्वारीचे कणीस इत्यादी वस्तू टाकल्या जातात व त्याची दिवा, धूप आणि अगरबत्ती लावून पूजा केली जाते. त्यानंतर सर्व सुवासिनी गोळा होऊन हे सुगडं पदरामध्ये झाकून एकमेकींना हळदी – कुंकू लावून हे सुगडं दान देतात. संक्रांतीनंतर रथसप्तमी पर्यंत हळदी – कुंकवाचा कार्यक्रम महिलांमध्ये सुरू होतो.

मकर संक्रांतीचे विविध भागातील नावे 

  • महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये मकर संक्रांति असे म्हणतात. 
  • दक्षिण भारतात या सणाला पोंगल असे म्हणतात. 
  • उत्तर भारतामध्ये मुगाची डाळ व तांदूळ यांची खिचडी तयार करतात त्यामुळे या सणाला उत्तर भारतामध्ये खिचडी संक्रांत असे देखील म्हणतात. 
  • भारतातील बंगाल प्रदेशांमध्ये संक्रांतीला तिळवा संक्रांति असे म्हणतात.
  • उत्तराखंडमध्ये घुघुटी या नावाने संक्रांती साजरी केली जाते.
  • आसाममध्ये माघ बिहू असे म्हणतात तर राजस्थानमध्ये सकरत असे म्हणतात.
  • पंजाब मध्ये माघी, जम्मूमध्ये माघी संग्रांद, हरियाणामध्ये सक्रत असे म्हणतात.
  • संक्रांतीला बिहारमध्ये दही चुरा असे म्हणतात. 

मकर संक्रांतीसाठी काळी साडी का वापरावी किंवा नेसावी? Why Use Black Saree for Makar Sankranti?

मकर संक्रांतीच्या वेळी काळ्या साड्या नेसणे ही भारताच्या काही भागात, विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये परंपरा आहे. काळ्या रंगाची निवड बहुतेक वेळा हिवाळ्याच्या हंगामाशी आणि कापणीच्या कालावधीच्या समाप्तीशी संबंधित असते. या सणादरम्यान काळा रंग शुभ मानला जातो कारण तो अंधाराचा अंत आणि अधिक सूर्यप्रकाशासह मोठ्या दिवसाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे.

मकर संक्रांतीच्या वेळी काळ्या साड्या नेसणे ही भारताच्या काही भागात, विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये परंपरा आहे. काळ्या रंगाची निवड बहुतेक वेळा हिवाळ्याच्या हंगामाशी आणि कापणीच्या कालावधीच्या समाप्तीशी संबंधित असते. या सणादरम्यान काळा रंग शुभ मानला जातो कारण तो अंधाराचा अंत आणि अधिक सूर्यप्रकाशासह मोठ्या दिवसाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे.

हे लक्षात घेणे आवश्यक आहे की भारतातील विविध प्रदेश आणि समुदायांमध्ये प्रथा आणि परंपरा भिन्न असू शकतात, म्हणून मकर संक्रांतीच्या वेळी काळी साडी परिधान करण्याचे महत्त्व सणाच्या सर्व उत्सवांना सार्वत्रिकपणे लागू होऊ शकत नाही.

हे सुद्धा वाचा :-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Traditional Sankranti Haldi Kunku Ceremony with Turmeric and Vermilion
मराठी लेख

हळदी कुंकू चे महत्व आणि हा समारंभ का साजरा केला जातो? | Importance of Haldi Kunku and why we celebrate it

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी कुंकू (Haldi Kunku) साजरे करण्याला अनन्य साधारण महत्त्व...

paithani manufacturer
मराठी लेख

पैठणी साडी कशी तयार केली जाते हे माहित नसेल तर हे नक्की वाचा!

paithani saree कुशल कारागीर हाताने विणतात (weaving) त्यामुळे ती प्रसिद्द आहे, हे...

फॅशन डिझायनर | Top 10 fashion designers in India
मराठी लेख

भारतातील टॉप 10 फॅशन डिझायनर | Top 10 fashion designers in india

भारतामधील काही टॉप फॅशन डिझायनर्स बद्दल आपण या ठिकाणी माहिती जाणून घेऊया....