मराठी उखाणे

Makar sankranti ukhane in marathi | मकर संक्राती उखाणे मराठी

Makar Sankranti Ukhane in Marathi - Traditions, Quotes, and Festive Celebrations

मकर संक्रांतीला उखाणे किंवा नाव घेणे हे महिलांसाठी विशेष असते. या सणाला नाव घेण्याची प्रथा फार पुरातन कालखंडापासुन चालत आलेली आहे. त्यामुळे मराठी महिलांसाठी मकर संक्रांत सणाविशेष उखाणे येथे तयार करण्यात आलेले आहे. हे नवीन आणि छान उखाणे महिलांना नक्कीच मदत करतील. या उखाणे घेण्याच्या प्रथेमुळे आनंददायी वातावरण तयार होते.

घराच्या दाराला
आबांच्या पानाचे तोरण
… रावांचे नाव घेते
संक्रातीला कारण


लग्नानंतर बदलून चालत नाही नुसत नाव
बदलावा लागतो स्वभाव
— रावांच्या घरी मिळाला मला
संक्रांतीच्या दिवशी मान


पौर्णिमेच्या चंद्राभोवती
चांदण्याची दाटी
— रावांचे नाव घेते
खास मकर संक्रांतीसाठी


रुक्मिणीने पण केला
श्रीकृष्णाला वरीन
— रावांच्या जीवावर
संक्रांत आनंदाने करिन


संक्रांतीच्या दिवशी
तिळाचे आणि गुळाचे सत्व
— रावांचे नाव घेते
आज हळदी कुंकवाचे महत्व


मकर संक्रांतीला
मी पैठणी घालुन नटते
— रावांसोबत सगळ्यांना
तिळगुळ वाटते.


उसापासून बनते
काकवी आणि गुळ
— रावांचे नाव घेऊन
वाटते मी तिळगुळ


नथ आणि चुडा
आहे सुहासिनींचा साज
— रावांचे नाव घेते
संक्रांत आहे आज


संक्रांतीच्या दिवशी घेण्यासाठी सुंदर मराठी उखाणे

काळ्या साडीला
चांदीचा साज,
…. रावांचे नाव घेते
संक्रांत आहे आज.


शुभप्रसंगी शुभ कार्याला
प्रथम पूजा श्री गणेशाची,
…  रावांचे नाव घेऊन
सुगड पूजते संक्रांतीची.


संक्रांतीला म्हणतात
तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
… आणि …  रावांच्या लग्नाच्या
वाढदिवसाला सगळे झाले गोळा.


वणीच्या गडावर आहे
सप्तशृंगी आईचा वास,
…  रावांना मी भरवते
तिळगुळाचा घास.


काळी  साडी तिला
हलव्याच्या दागिन्यांचा साज,
…. रावांचे नाव घेते
मकर संक्रांतीचा सण आहे आज.


तिळगुळ घ्या गोड गोड बोला
संक्रांतीला म्हणतात सारे,
… रावांचे नाव घेते
सर्वांनी इकडे लक्ष द्या बरे.


संक्रांतीला बनवली पुरणाची पोळी
आणि त्यावर घातले भरपूर तूप,
…  रावांचा स्वभाव
मला आवडतो खूप. 


फॅशन प्रमाणे जगावे
पण सोडायचे नाही
आपले संस्कार आणि मूळ,
  …  रावांचे नाव घेऊन
वाटते सर्वांना तिळगुळ.


साता जन्माची पुण्याई
फळाला आली आज,
…  रावांच्या नावाने
मिरवते मंगळसूत्राचा  साज.


संध्याकाळी तुळशीला
रोज लावते दिवा,
…  रावांचे नाव घ्यायला
आग्रह कशाला हवं.


जाई जुईच्या फुलांपेक्षा
शोभून दिसते शेवंती,
…  रावांना सुखी ठेवा
हीच देवाला विनंती.


पानाचा विडा
त्याला मान मोठा
…. रावांच्या संसारात
नाही कशाला तोटा.


राम सीतेचे चरण
नेहमी स्मरते ध्यानात,
….  रावांचे स्वरूप
सदैव माझ्या मनात.


रात्रीच्या  काळोखामध्ये
सुंदर दिसतात तारे,
… रावांचे नाव घेते
लक्ष द्या सारे.


साडी घालते फॅशनची
पदर घेते साधा,
…  राव माझे कृष्ण
आणि मी त्यांची राधा.


एक निरांजन
त्याला दोन वाती,
…  राव माझे पती
आणि मी त्यांची सौभाग्यवती.


चांदीच्या ताटात
फणसाचे गरे,
…राव दिसतात बरे
पण वागतील तेव्हा खरे.


रातराणीच्या  सुगंधाने
परिसर झाला मोहित,
… रावांना आयुष्य मागते
सासू-सासर्‍यांसहित.


नाण्याच्या दोन बाजू
म्हणजे सासर आणि माहेर,
… रावांनी दिला
मला सौभाग्याचा आहेर.


महालक्ष्मीला वाहण्यासाठी
कमळाचे फुल तोडले,
… रावांसाठी
मी आईबाप सोडले.


संक्रांतीच्या दिवशी
पतंग उडवतात सारे,
… रावांचे नाव घेते
सर्वांनी ऐकून घ्या बरे.


मकर संक्रांतीसाठी
नेसली काळी साडी छान,
..  रावांचे नाव घेते
ठेवून तुमचा मान.


संक्रांतीला पसरतो
पुरणपोळीचा सुगंध,
… रावांनी आणला
माझ्या जीवनात आनंद.


संक्रांतीला तिळगुळ घेण्यासाठी
झाले सर्वजण गोळा,
… रावांचा स्वभाव
आहे फारच भोळा.


उसापासून बनवतात
साखर आणि गुळ,
…  रावांचे नाव घेते
सांडू नका तिळगुळ. 


तिळगुळ घेऊ आणि
गोड गोड बोलू,
… राव आहेत हौशी
खोटं कशाला बोलू. 


पारिजाताच्या झाडाखाली
फुलांचे सडे,
… रावांचे नाव घ्यायला
मी नेहमी पुढे.


नको चांदीचा साज
नको माणिक मोत्याचा हार,
…  रावांसोबत मी
सुखी आहे फार.


चांदीच्या ताटात
सोन्याची नाणी,
….  राव आहे राजे
आणि मी त्यांची राणी.


नदीकाठी मोर
किती सुंदर नाचतो,
…  रावांनी संक्रांतीला घेतली मला साडी
तिचा रंग कसा खुलतो. 


तळ्याच्या काठावर बसली
राजहंसाची जोडी,
…  रावांमुळे आली
जीवनाला गोडी.


अंगणामध्ये वृंदावन
वृंदावनात तुळस,
…. रावांचे नाव घ्यायला
मला नाही आळस.


अंगणात होती तुळस
तुळशीला घालत होते पाणी,
… रावांचे नाव घेते
मी त्यांची राणी.


नाव घ्या, नाव घ्या,
नावात काय विशेष,
… रावांचे नाव घेते
ते माझे मिस्टर आणि मी त्यांची मिसेस.


कमळाच्या देठात
शिरला मदनबाण,
… राव माझे
जीव की प्राण.


मोत्याचे मनी
घरभर पसरले,
…रावांसाठी
आईबाप विसरले.


संसाराच्या अंगणात
ऊन – पावसाचा खेळ,
…  रावांचा आणि माझा
चांगलाच बसतो मेळ. 


सोन्याच्या अंगठीत
गुलाबी खडा,
… रावांचा आणि माझा
सात जन्माचा जोडा.


चांदीचे निरांजन
त्याला साजूक तुपाची फुलवात,
… रावांसोबत करते
नवीन आयुष्यची सुरुवात.


सर्व देवतांच्या आशीर्वादाने
मिळो सुख आणि ऐश्वर्या,
… राव देतात मला
नेहमीच प्रेरणा आणि धैर्य.


खजूर, गूळ आणि चिंच घालून करते
पाणीपुरीच आंबट – गोड पाणी,
…  राव आहेत
राजा आणि मी त्यांची राणी.


पुढे अजून उखाणे पहा (Read More)

हे सुद्धा वाचा :-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles