मराठी लेख

हळदी कुंकू चे महत्व आणि हा समारंभ का साजरा केला जातो? | Importance of Haldi Kunku and why we celebrate it

Traditional Sankranti Haldi Kunku Ceremony with Turmeric and Vermilion

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी कुंकू (Haldi Kunku) साजरे करण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. हा एक सामाजिक कार्यक्रम आहे जो समाजातील बांधिलकी वाढवतो. हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण सुवासिनींना आपल्या घरी आमंत्रित करतो. या सुवासिनी साक्षात आदिशक्तीचे स्वरूप म्हणून आपल्या घरामध्ये येतात आणि आपण जेव्हा त्यांना हळदी कुंकू लावतो तेव्हा साक्षात आदिशक्तीचे रूप हे जागृत होते. त्यामुळे आपण अप्रत्यक्षरीत्या देवीची म्हणजेच आदिशक्तीची पूजा करतो. हळदी-कुंकू वा बरोबरच सुवासिनींना वाण म्हणून एक भेटवस्तू देखील दिली जाते. 

हा कार्यक्रम संक्रांती पासून सुरू होतो तर रथसप्तमी पर्यंत चालू असतो.

Haldi Kunku Decoration: Traditional Indian Celebration

हळदी कुंकू कार्यक्रमाची तयारी कशी करावी | How to prepare for Haldi Kunku event | Haldi Kunku karyakram chi tayari kashi karavi

  • सर्वात आधी हळदीकुंकवासाठी संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत च्या दरम्यान एक योग्य दिवस निवडावा. 
  • संपूर्ण घर स्वच्छ करावे जर तुम्हाला आवडत असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एखाद्या थीम प्रमाणे तुमच्या घराला सजवू शकता. 
  • हळदी कुंकू निमित्ताने एखादी छान रांगोळी काढून येणाऱ्या सुवासिनींना बसण्यासाठी योग्य व्यवस्था करावी. 
  • त्यांच्यासाठी चहा आणि नाश्त्याची पूर्वतयारी करून ठेवावी त्यामुळे वेळेवर आपली धावपळ होणार नाही. 
  • ताट सुंदर सजवून त्यामध्ये हळदी कुंकू ठेवावे, तसेच सुवासिनींना देण्यासाठी तिळगुळ किंवा तिळाचे लाडू ठेवावे.
  • सुवासिनींना देण्यासाठी आणलेले वाण म्हणजेच भेटवस्तू याची व्यवस्थित मांडणी करून ठेवावे.
  • घरातील सर्व तयारी झाल्यानंतर एक योग्य वेळ ठरवून त्या वेळेला सर्व सुवासणींना हळदीकुंकवाला येण्यासाठी आमंत्रण द्यावे.
  • सुवासिनी आल्यानंतर सर्वप्रथम त्यांना चहा आणि नाश्ता द्यावा.
  •  त्यानंतर सुवासिनींच्या कपाळाला हळदी कुंकू लावावे  आणि हातामध्ये तीळ किंवा तिळाचा लाडू द्यावा.
  •  हळदी कुंकू लावून झाल्यानंतर सर्व सुवासिनींच्या पाया पडावे.
  •  हे सर्व झाल्यानंतर आपण आणलेले वाण ओटीमध्ये ( साडीच्या पदरामध्ये ) घालावे.
  • आपण या ठिकाणी उखाण्यांचा कार्यक्रम देखील आयोजित करू शकतात. तसेच गाणी म्हणणे, डान्स, वेगवेगळे खेळ यांचा देखील आपण या कार्यक्रमांमध्ये समावेश करू शकतो.

अशा प्रकारे आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकतो.

Celebration of Haldi Kunku Vaan with Traditional Decor and Cultural Elements

हळदी कुंकू वाण काय द्यावे ? Haldi kunku vaan Ideas

हळदी कुंकू (haldikunku) म्हटलं म्हणजे सुवासिनींना वाण काय द्यावं हा तर सर्वात मोठा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया हळदी कुंकवासाठी काय काय वस्तू वाण म्हणून देऊ शकतो आणि ज्या आपल्याला परवडणाऱ्या देखील असतील. चला तर मग बघूया या खालील १3 भन्नाट नवीन vaan Ideas!

  • छोटीशी पर्स : बाजारामध्ये छोट्या-छोट्या अशा सुंदर पर्स देखील उपलब्ध आहेत, ज्या वाण म्हणून देण्यासाठी अतिशय छान पर्याय आहे.
  • देवघरातील निरंजन : रोजची देवपूजा करण्यासाठी निरंजन ही भेट वस्तू चांगला पर्याय ठरू शकतो.
  • ब्युटी टिप्स पुस्तक : सुदंर दिसण्यासाठी प्रत्येक महिला काहींना काही करत असतात त्यामुळे ब्युटी रेसिपीज पुस्तक वान म्हणून चांगली संकल्पना आहे.
  • मोबाइल कव्हर : प्रत्येक महिलेकडे मोबाईल असतोच त्यामुळे मोबाइल कव्हर गिफ्ट महिलांना नक्की आवडेल.
  • फुलाचे रोपटं : फुलांच्या झाडामुळे आपल्या घराची शोभा वाढते. तसेच देव पूजेला देखील आपण फुले देवाला वाहतो. म्हणून एखाद्या फुलाचे रोपट वाण म्हणून देण्यासाठी एक अतिशय छान निवड आहे.
  • मिनी कॅलेंडर : नवीन वर्ष सुरू होताच सर्वजण घरामध्ये नवीन कॅलेंडर घेतात. आणि संक्रांति हा सण वर्षाच्या सुरुवातीलाच असतो. त्यामुळे आपण या निमित्ताने एक उपयोगी वस्तू म्हणून मिनी कॅलेंडर हे वाण देऊ शकतो. 
  • कुंकवाचा करंडा : आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुंकवाला फार महत्त्व आहे. प्रत्येक महिलेकडे कुंकवाचा करंडा हा घरामध्ये असतोच आणि हा सण सुवासिनींचा हळदी कुंकवाचा असल्यामुळे हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे वाण म्हणून देण्यासाठी.
  • बॅग्ज : नियमित वापरात येणाऱ्या छान-छान बॅग देखील आपण वाण म्हणून देऊ शकतो. बाजारामध्ये अतिशय सुंदर प्रकारच्या बॅग्ज आपल्याला मिळतील.
  • आर्टिफिशियल मंगळसुत्र : आज-काल बऱ्याचशा महिला आर्टिफिशियल मंगळसूत्राचा वापर करतात. आणि हे मंगळसूत्र आपल्या खिशाला परवडणारे देखील असतात. बाजारामध्ये अतिशय सुंदर डिझाईन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्रे उपलब्ध आहेत. वाढत्या सोन्याच्या भावामुळे शक्यतो बऱ्याच महिलांचा कल या आर्टिफिशियल मंगळसूत्रांकडे आहे. त्यामुळे आपण वाण म्हणून हे मंगळसूत्र देऊ शकतो.
  • टिकल्यांचे पॅकेट : एक उत्तम निवड आहे. आज-काल बऱ्याचशा महिला शक्यतो टिकलीच वापरतात आणि त्यामुळे टिकल्यांचे पॅकेट आपण वाण म्हणून देऊ शकतो.
  • बांगड्या : बांगड्या हा तर सुवासिनींचा महत्त्वाचा अलंकार आहे. आणि त्या वाण म्हणून जर  दिल्या तर अतिशय योग्य. बाजारात आपल्याला बऱ्याच प्रकारच्या काचेच्या किंवा मेटल्सच्या बांगड्या मिळतील. 
  • कापडी पिशवी : कापडी पिशवी ही तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये बऱ्याचदा वापरात येते. हा एक उत्तम पर्याय आहे आणि यातून निसर्गाच्या संवर्धनात आपले योगदान देखील होते.
  • बटवा ( पोटली ) :  बटवा हा महिलांची आवडती आणि उपयोगात  येणारी वस्तू आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा लग्नासाठी फार उपयोगी येतो. त्यामुळे आकर्षक बटवा आपण निवडू  शकता. 
  • तुळशीचे रोप : आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला फार महत्त्व आहे. दररोज तुळशीची पूजा केली जाते, म्हणून तुळशीचे रोप वाण म्हणून देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
  • जाळीच्या पिशव्या : जाळीच्या पिशव्या ह्या आपल्याला फ्रिजमध्ये भाजीपाला ठेवण्यासाठी अतिशय उपयोगात येतात. ज्यामुळे फ्रिजमध्ये भाजीपाला इकडे-तिकडे पसरत नाही आणि फ्रिजमधील सर्व वस्तू आपल्याला व्यवस्थित ठेवता येतात. म्हणून जाळीच्या पिशव्या हा देखील एक छान पर्याय आहे. 
  • मेक-अप चे सामान : सर्वच महिलांना मेक-अप करण्याची फार आवड असते. यामध्ये भरपूर वस्तू आपल्याला बघायला भेटतील, म्हणून हा एक छान पर्याय आहे वाण म्हणून देण्यासाठी.

हे सुद्धा वाचा :-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

People celebrating Makar Sankranti in traditional Marathi attire.
मराठी लेख

मकर संक्रांत म्हणजे काय? ती का साजरी केली जाते? | Why celebrate makar sankranti?

मकर संक्रांत (makar sankranti) हा प्रेम संवर्धनाचा सण. नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात...

paithani manufacturer
मराठी लेख

पैठणी साडी कशी तयार केली जाते हे माहित नसेल तर हे नक्की वाचा!

paithani saree कुशल कारागीर हाताने विणतात (weaving) त्यामुळे ती प्रसिद्द आहे, हे...

फॅशन डिझायनर | Top 10 fashion designers in India
मराठी लेख

भारतातील टॉप 10 फॅशन डिझायनर | Top 10 fashion designers in india

भारतामधील काही टॉप फॅशन डिझायनर्स बद्दल आपण या ठिकाणी माहिती जाणून घेऊया....